Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीकोंढाळा येथिल 'हिरकणी फुड्स' ने मीळवीला महाराष्ट्र बीजनेस आयकॉन अवार्ड.....- मसाले,बेसन,मिरची पावडर,हळद...

कोंढाळा येथिल ‘हिरकणी फुड्स’ ने मीळवीला महाराष्ट्र बीजनेस आयकॉन अवार्ड…..- मसाले,बेसन,मिरची पावडर,हळद पावडर,धने उत्पादन करून महाराष्ट्रात पाडली छाप…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- नुकताच महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवार्ड वितरण कार्यक्रम,केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार व सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत यांच्या हस्ते दिनांक ८ जूलै ला नाशिक या ठीकाणी वितरीत करण्यात आला.यात गडचिरोली जिल्हातील कोंढाळा येथिल हिरकणी फुड्स या उत्पादक कंपनीने गडचिरोली सारख्या दुर्गम भागात आपल्या उद्योगाची सुरवात करून खुप कमी वेळात ग्रामीण तथा शहरी भागात आपले एक स्थान निर्माण केले आहे.ह्या सर्वांची नोंद घेत नाविन्यपुर्ण व सर्जनशिल क्षेत्रातील रिसेल तर्फे यंदाचा सर्वोत्कृष्ट बिजनेस आयकॉन अवार्ड देवून सन्मान करण्यात आले आहे.हीरकणी फुड्स कंपनी च्या माध्यमातून मसाले, बेसन, मिरची पावडर, हळद पावडर, धने, इत्यादी प्रकारचे उत्पादने घेतली जातात.खरं तर कोरोणा काळानंतर अनेकांचे रोजगार गेले होते आधीच रोजगार कमी असलेल्या जिल्हात परत बेरोजगारी चे प्रमाण वाढले होते. पण ग्रामीण भागातील तरूणांनीही अश्या परिस्थितित हार न मानता एकमेकांसाठी परत उभे राहुन परिस्थितिशी दोन हात करावे असा विचार करत नितून सिताराम मोहुर्ले या उच्च शिक्षीत तरुणान आपल्या मीत्रांना सोबत घेत ह्या हिरकणी फुड्स उद्योगाचा प्रवास ९ सप्टेंबर २०२१ ला सुरू केला.”मित्रांनी मित्रांसांबोत मिळून मित्रांसाठी बेरोजगारी वर मात करायला केलेली एक सुंदर सुरवात म्हणजे हिरकणी फुड्स” असे मत हिरकणी चे फाउंडर नितून मोहुर्ले यांनी नाशिक येथिल पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.प्रामुख्याने ग्राहकांसाठी योग्य आणि कोणत्याही मीश्रीत रसायनांशीवाय आरोग्यासाठी उपयुक्त अश्या सेंद्रीय अन्न व मसाल्यांचे उत्पादन करणे.

तरूण बेरोजगारांच्या हाताला काम देत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.व स्थानीक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे; अश्या बहुउद्देशांतून ह्या हिरकणी फुड्स कंपणीचा प्रवास गडचिरोली जिल्हात सुरू झाला व त्यांची नोंद घेत महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवार्ड देवून गौरवीण्यात आले.ह्या मित्रांनी केलेल्या सुंदर सुरवातीला परत पुढे नेवून अनेकांच्या हाताला रोजगार देण्याचे उद्देश्य आहे ते आम्ही पुर्णत्वास नेवू असे मत कार्यक्रमादरम्यान नितून मोहुर्ले यांनी व्यक्त केले. व त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी पंकज खोडवे, प्रतीक चौधरी,मयुर चौधरी,नेहल रामटेके,चंदू ठाकरे, संतोष धोटे,बाळू रामटेके व त्यांचे मामा टिकराम शेंडे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व मित्र परिवाराला व कोंढाळा येथिल सर्व जनता व आपल्या सर्व ग्राहकांना दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!