Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीसंजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात ५०० रुपयांची झाली वाढ- लाभार्थ्यांना महिन्याला मिळणार...

संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात ५०० रुपयांची झाली वाढ- लाभार्थ्यांना महिन्याला मिळणार १५०० रुपये- ५ जुलै २०२३ पासून अंमलबजावणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या १००० रुपये इतक्या मासिक अर्थसहाय्यात ५०० रुपये इतकी वाढ करुन अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रुपये दिनांक- ५ जुलै २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.

सदर अर्थसहाय्यात वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू करण्यात आली आहे.त्यानुसार १ अपत्य किंवा २ अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा १५०० रुपये इतकी राहील.तसेच दिनांक २० ऑगस्ट,२०१९ च्या शासन निर्णयातील लाभार्थ्याच्या मुलाची २५ वर्ष वयाबाबतची अट रद्द करण्यात आली आहे.

हयात प्रमाणपत्राच्या तरतूदीमध्ये बदल करण्यात आला असून लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयात प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्याचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात येणार आहे.

तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याच्या मुलाला नोकरी मिळाल्यानंतर (यामध्ये – शासकीय,निमशासकीय व खाजगी नोकरीचा समावेश)मुलाचे व कुटूंबाचे उत्पन्न विचारात घेऊन लाभार्थ्याची पात्रता ठरविण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!