उद्रेक न्युज वृत्त
कोरपना ता.प्र/नितेश केराम
कोरपना(चंद्रपूर) :- महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२३ रोजी कन्हाळगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहन करून अंगनवाडी सेविकांना मोबाईल वितरित करण्यात आले. प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुरेखाताई नवले,उपसरपंच विनोद नवले ग्रामपंचायत सदस्य महादेव कोवे, रमेश मोहुर्ले, मायाबाई भोयर,अनिता धुर्वे शिंदे ग्रामसेवक, शारदा मेश्राम,मोबीलाईलजर,सूरज भोयर,विठ्ठल पारखी पाणी पुरवठा कर्मचारी,प्रदीप निरांजणे संगणक चालक,मनोहर बावणे तंटामुक्ती समिती,पोलीस पाटील गोवर्धन मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल वितरित करून सरपंचा सुरेखाताई यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विठ्ठल पारखी यांनी प्रसंगी आभार व्यक्त केला.