Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजअखेर लिखित मागण्या मंजूर झाल्याने सत्यवान रामटेके यांनी आमरण उपोषण घेतला मागे....-...

अखेर लिखित मागण्या मंजूर झाल्याने सत्यवान रामटेके यांनी आमरण उपोषण घेतला मागे….- ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेतील प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठांकडे ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजनेच्या भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार दाखल करुनही कुठल्याही प्रकारची चौकशी वा कारवाई करण्यात आली नसल्याने सत्यवान रामटेके यांनी आज २ मे २०२३ रोजी देसाईगंज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता.त्यानुसार आज सकाळ पासूनच आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला.अशातच रामटेके यांना विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला.त्यानुसार देसाईगंज आम आदमी पार्टी,पीपल्स रिपब्लिकन पार्टी गडचिरोली,देसाईगंज समाजवादी पार्टी, देसाईगंज युवक काँग्रेस पार्टी यांनी कार्यकर्त्यांना घेऊन रामटेके यांच्या आमरण उपोषणस्थळी भेट दिली व देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला; त्यानंतर दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी,कर्मचारी यांनी आमरण उपोषणस्थळी भेट देऊन सत्यवान रामटेके यांनी मागणी केलेल्या मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्याने अखेर आमरण उपोषण मागे घेण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!