Tuesday, November 11, 2025
Homeचंद्रपूरमणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे...

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे निदर्शने

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बल्लारपुर :- आम आदमी पक्षाच्या वतीने मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू करण्यात आली असून आपने भाजपा सरकारवर हल्ला बोल करून टीकास्त्र उगारले आहे.हल्ला बोल करतांना म्हटले आहे की,मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे.सदर संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे.जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्रातील भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकला नाही.आत्तापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे.परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही.पंतप्रधान सर्व जग फिरताहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत.हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही.मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही.त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे.भाजपाने देशात ‘डर का मोहोल’ असे वातावरण तयार केले असल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाही.अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात व तालुका स्थरावर तीव्र निदर्शने केली आहेत.केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी; तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी; अशी मागणी आम आदमी पार्टी बल्लारपुरने केली आहे.

निदर्शनवेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार,जि. संघठण मंत्री प्रा.नागेश्वर गंडलेवार,शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार,प्रा.प्रशांत वाळके,सचिव ज्योती बाबरे,संघठण मंत्री रोहित जंगमवार,सह सचिव आशिष गेडाम,युथ अध्यक्ष सागर कांबळे,महिला अध्यक्षा किरण खन्ना,उपाध्यक्ष सलमा सिद्दिकी, नलिनी जाधव,सचिव शीतल झाडे,बेबी बुरडकर,राजू शेंडे,अतुल मडावी,महेंद्र चुनारकर,स्मिता लोहकरे,रेखा भोंगे,कविता हरबड़े,निशा नंदवंशी,रेबिका जांभूळकर, प्रजवल चौधरी आणि इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज नगराध्यक्ष पदासाठी वनिता नाकतोडेंचे नाव फ्रंट पेजवर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज (गडचिरोली):-नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुक प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होताच अनेकजण मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या...

अल्पवयीन मुलास अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्यास बेड्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून एका अल्पवयीन मुलास अश्लील(पॉर्न)व्हिडिओ दाखवणाऱ्या ३० वर्षीय इसमास पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.प्रकरणी बाललैंगिक अत्याचार कायदा व पॉक्सो कायद्याच्या...

शेतीसाठी तारेची कुंपण योजना; ८५ टक्क्यापर्यंत अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राणी आणि मोकाट जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच रब्बी हंगामातील लागवड क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद कृषी विभागाने “शेतीसाठी...

भीषण स्फोटाने हादरली देशाची राजधानी; आठ जणांचा मृत्यू…

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली एका भीषण स्फोटाने हादरली असल्याची घटना उघडकीस आली आहे.दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्थानकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!