उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली (कोरची):- कोरची तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या धोलिकसा ते नाडेकल या रत्याचे काम सुरू आहे.सदर कामावर ट्रॅक्टरने गिट्टी टाकण्याचे काम सुरू असून कामावर गिट्टी टाकून चालक राजेंद्र वरखडे व सोबत मजूर मयाराम ताडामी परत येत असतांना पुराडा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी दिघोरे व सोबत असलेले वनरक्षक गावड व वनकर्मचारी यांनी ट्रकटर थांबविले आणि चालकास उतरण्यास सांगितले. मयाराम ताडामी यालाही उतरविले आणि कोणतीही चौकशी न करता बेदमपणे बांबू आणि लाठया काठ्यानी मारण्यास सुरवात केली.यात मयाराम ताडामी गंभीर जखमी झाल्याने तात्काळ कोरची दवाखान्यात भरती करण्यात आले.मार जास्त असल्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.मारहाण करणारे वनरक्षक गावड सोबतची चमू यांनी भरपूर दारू पिऊन असल्याचे आज २८ फेब्रुवारीला बेडगाव येथील जखमी मजूर ताडामी व चालक वरखडे ची भेट घेतली व हकीकत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतली.मजूराला व ड्रायव्हरला वन अधिकाऱ्यांना मारण्याचा अधिकार कुणी दिला.काही दिवसांपूर्वी अमर कन्स्ट्रकशनचे पुराडा मालेवाडा रस्त्याचे काम सुरू होते.
तिथेही वन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावार उभी असलेली जेसिपी अटक केली व खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठविले.तसेच ३ ते ४ महिन्यांपूर्वी अंतरगाव परिसरात शेती जवळील काठ्या-कुठ्या जेसीपी ने साफ- सफाई करतांना जेसिपिला अटक केली.नंतर देवाण-घेवाण करून दुसऱ्या दिवशी कारवाही न करता सोडून दिले.असा आतंक पूराडा वन परिक्षेत्रातील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सुरू केला.यामुळे सर्व साधारण जनता विकासाचे काम करणाऱ्यावर खोटी कारवाहीची दहशत पसरली आहे.तरी वन परिक्षेत्र अधिकारी दिघोरे,वनरक्षक गावडे सोबतची चमू तसेच वनरक्षक ढवळे यांना निलंबित करावे; अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,कोरची तालुका प्रमुख डॉ.नरेश देशमुख,लोकेंद्र शहा,सयाम मुजहीन शेख,गुरुदेव मेश्राम,कामगार सेनेचे अनिल उईके यांनी पत्रकाद्वारे केली आहे.