उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- जिल्ह्यातील वरोरा शहारा नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने कार ला धडक देताच डॉक्टर पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर डॉक्टर पतीला रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला असल्याची घटना आज २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
डॉ.अतुल गौरकार व अश्विनी गौरकार-झाडे वय ३१ वर्षे असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.आज दुपारी डॉक्टर दाम्पत्य बाळाला घरी ठेऊन वरोरा येथे गेले होते.दुपारच्या सुमारास एमएच ३४ ए एम ४२४० कारने वरोरा येथून वणीकडे निघाले असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच ३४-बि झेड २९९६ ट्रकने कारला जोराची धडक दिली असता डॉ.अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.तर डॉ.अतुल गंभीर जखमी झाले.सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉ.अतुल यांना चंद्रपूर रुग्णालयात नेत असतांना भद्रावती जवळील वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.