Sunday, August 2, 2026
Homeभंडाराभरदिवसा चोरी; महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाले..

भरदिवसा चोरी; महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पर्स हिसकावून पोबारा केल्याने परिसरात एकच खळबळ माजली. महिला ओरडत राहिली अन् चोरटे क्षणात दिसेनासे झाल्याची घटना १२ जानेवारी रोजी तुमसर शहराच्या गोवर्धननगर भागातील दुर्गा मंदिरासमोरील गल्लीत घडली.अनिता चामट वय ४५ वर्षे,रा.इंदिरानगर ता.तुमसर,जि.भंडारा असे फिर्यादी महिलेचे नाव असून त्या सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या होत्या.त्यांनी आपल्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची रोकड काढली आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. यादरम्यान,गोवर्धन नगरमधील दुर्गा मंदिर समोरील गल्लीतून जात असतांना,अचानक आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील पैशांची पर्स हिसकावून वेगाने पळ काढला.अचानक घडलेल्या प्रसंगाने त्या काहीकाळ गोंधळून गेल्या.आरडाओरड करेपर्यंत चोरटे क्षणात नजरेआड झाले.घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.प्रकरणी तुमसर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून बँकेपासून ते घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरील विविध सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासले जात आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!