उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- मागील वर्षात बुद्ध विहार कोठरी परिसरातील समापण सोहळ्याचा कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी १३ लाख रुपये धम्मदान म्हणुन वर्गणी गोळा करून दिली होती.सदर रकमेतुन भगीरथने बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी साधी एकही विट लावली नाही.अशातच मिळालेल्या संपूर्ण रकमेचा हिसोब आयोजकांनी एका बैठकीत विचारले असता; ते टोलवा टोलविचे उत्तर देत असल्याचा आरोप प्रा.मूनिश्र्वर बोरकर यांनी केला आहे.
बोरकर यांनी म्हटले की,मागील वर्षात समापण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून स्वतः बोरकर यांनी ११ लाख रुपये बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करून दिली.तसेच मानकर ताईकडून १ लाख व स्वतः मुनिश्वर बोरकर यांनी स्वतः १ लाख रुपये देणगी दिली.एकंदरीत १3 लाख रुपये वर्गणी म्हणुन सहकार्य केले होते.परंतु भगीरथ भन्ते यांनी सदर रक्कमेचा कोणताच विनियोग न करता उलट समाजाच्या लोकांनी दिलेल्या वर्गणीतून त्यांनी आपल्या मुलांचा वाढदिवश साजरा केला व वाढदिवसाच्या कार्यक्रमात ५ लाख रुपये खर्च केले.जो मुलगा वर्धा येथे आपल्या आईसोबत राहतो.त्याच्या वाढदिवशाच्या कार्यक्रमात नाटकाचे आयोजन केले होते.तसेच गावजेवण,भव्य रोषणाई व इतर खर्च मिळून एकंदरीत ५ लाख रुपये बौद्ध बांधवाच्या दिलेल्या वर्गणीतुन खर्च केले.गोळा झालेल्या धम्मदानातुन अश्या प्रकारे पैशाची उधळपट्टी करणे व इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे.असाही आरोप प्रा.मूनिश्र्वर बोरकर यांनी केला आहे.बौद्ध बांधवाच्या दिलेल्या वर्गणीवर अशा प्रकारे डल्ला मारणे व स्वतःला मोठे म्हणवून घेणे तसेच मिळालेल्या संपूर्ण रकमेचा हिसोब आयोजकांनी मागितलेल्या प्रमाणे न देणे सदर बाब चुकीची असल्याने अशांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अन्यथा ‘आम भरो व स्वतःचे पोट भरो’ करणाऱ्याला वर्गणी देणार कोण? हे तितकेच महत्त्वाचे आहे.