उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील कोठरी जंगलात अवैध घरकुल बांधकाम करून वास्तव्यास राहणारे भन्ते भगीरथ यांच्या घरा शेजारी लाखो रुपयांची रेती,सागवणी पाट्या व सेंट्रीगचे फाटे असल्याची गुपित माहिती वनविभाग घोटचे वन परिक्षेत्र अधिकारी वाडीघरे यांना मिळताच त्यांनी आपल्या फौजफाट्या सहीत जवळपास १५ कर्मचारी कोठरी जंगल परिसरात पोहचले व घोट वनविभाग उद्याणा समोर भन्ते भगीरथचे अवैध घरकुल बांधकाम असून त्या घरा शेजारी मोठ्या सिताफीने भन्तेनी अंदर १० फुट खोल अंडर ग्राउंड रुम तयार केली होती.त्यातील तपासणी वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.तपासणी करताच सात सागवणी पाट्या सापडल्या व त्याच जंगलातील सागवणी झाडे कापून त्यांचा पाट्या तयार करून ठेवल्या असावा असा अंदाज वर्तविण्यात आला होता; असे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सांगीतले.शिताफीने,घोट वनविभागाचे कर्मचारी यांनी सदर जागेची झडती घेतली परंतू फक्त पाच ते सहा सागवणी पाट्या सापडल्या.तर जवळच लागुन जवपास शेकडो ब्रास रेती सुध्जदा जप्त केली.सदर अवैध रेतीचा साठा कुठून आलाय? याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे कळते.
प्राप्त माहितीनुसार,वनविभागाच्या वतीने कार्यवाही होणार असल्याचे बघून भन्ते भगीरथ,प्रवेश बांबोळे व भन्ते त्रिरथ वनखी हे तिघेही वनविभागाची गाडी दिसताच दुम दबाके जंगलात पळाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.वन परिक्षेत्र अधिकारी वाडीघरे सदर जप्त केलेल्या साहित्यांचा पंचनामा करून भगीरथच्या नावाने पकड वॉरान्ट सोडणार असल्याचे माहिती वाडीघरे यांनी दिली.घोट वन क्षेत्रातील हि पहिलीच मोठी कारवाई असून रेती तस्कर व झाडे कटाई करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.