Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-मागील दोन वर्षांपासून भुती नाल्यावरील इंग्रजकालीन पूल जीर्ण झाल्याने नव्या पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे.अश्यातच आवागमन करण्यासाठी भुती नाल्याच्या बाजूला
वळण मार्ग म्हणून तात्पुरता रपटा(कच्चा रस्ता)तयार करण्यात आला होता.मात्र,तीन दिवसांपासून दररोज पडणाऱ्या पावसामुळे ब्रम्हपुरी-देसाईगंज महामार्गावरील रपटा वाहून गेल्याने मार्गावरील जड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.त्यातच दुचाकीधारक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.पर्यायी मार्गावर लहान पूल असल्याने अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करू लागलेत. त्यामुळे एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्या स्थितीत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढून परत पुन्हा संपूर्ण मार्ग बंद पडू शकतो.पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकी वा इतर वाहनांनी रस्ता ओलांडू नये,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असले तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!