Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीबोगस बियाणे व खते विक्री करतांना आढळल्यास परवाना होणार रद्द; १३ भरारी...

बोगस बियाणे व खते विक्री करतांना आढळल्यास परवाना होणार रद्द; १३ भरारी पथके स्थापन.. – युरिया खत जादा दराने विक्री केल्यास व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिकिंग केल्यास कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील बियाणे,खते व किटकनाशके यांच्या खरेदी विक्री,गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष,खरीप हंगाम २०२५ करिता १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ व रबी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत स्थापन करण्यात आलेला आहे.सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० वाजे ते सायंकाळी ७ वाजे या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रार किंवा अडचण dsaogad15@gmail.com /adozpgad@gmail.com या मेल द्वारे पाठविता अथवा नोंदविता येईल असे आवाहन कृषि विकास अधिकारी कु.किरण खोमणे यांनी शेतकरी,कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व किटकनाशके विक्रेते व सर्व नागरिकांना केले आहे.जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १३ भरारी पथके स्थापन केलेले आहे.बोगस बियाणे,खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही केली जाईल. यासंबंधित कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे.बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये,याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे.तसेच युरिया खत जादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!