- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या कुरंडीमाल येथील ग्रामपंचायतीचा शिपाई अमृत सुखदेव सराटे वय ३० वर्षे, रा.कुरंडीमाल,ता.आरमोरी
हा १६ नोव्हेंबरला सकाळी शौचास जातो म्हणून घरून निघून बाहेर पडला होता; परंतु बराच वेळ होऊनसुद्धा तो घरी परतला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधा-शोध केली,पण त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.त्यामुळे कुटुंबीयांनी आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.अशातच काल,मंगळवारी ३ डिसेंबरला गावातील एक व्यक्ती सरपण आणण्यासाठी जंगलात गेला असता,त्यास एक व्यक्ती झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला.जवळ जाऊन बघितले असता,गावातीलच बेपत्ता असलेला ग्रामपंचायतीचा शिपाई असल्याचे लक्षात येताच घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.त्यानुसार आरमोरी पोलिसांना पाचारण करण्यात आले.आरमोरी पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून जागेवरच उत्तरीय तपासणी केली.त्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आरमोरी ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.शिपायाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नसून पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
- Advertisement -