Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीबेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस मिळणार एक लाख रुपये..

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस मिळणार एक लाख रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी)कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची किंवा बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस शासनामार्फत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लाहाडे यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची सभा पार पडली.या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लाहाडे होत्या.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सध्या कार्यरत असलेल्या ४० नोंदणीकृत सोनाग्राफी केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे,डॉ.निलकंठ मसराम, डॉ.प्रशांत पेंदाम,डॉ.प्रशांत आखाडे,ॲड.संजय ठाकरे, गणेश नेते,लता पुनघाटे,पुष्पा लाडवे सह अन्य सदस्य उपस्थित होते.सभेची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन पीसीपीएनडीटीच्या विधी सल्लागार ॲड.तृप्ती राऊत यांनी केले.
  • माहिती देणाऱ्याचे नाव राहणार गुपित👇
जिल्ह्यामध्ये कुठेही गर्भलिंग परीक्षण करून अवैध गर्भपात होत असेल किंवा सोनाग्राफी केंद्रात अपात्र व्यक्तींकडून तपासणी केली जात असेल,तर त्याची खात्री करून प्रशासनाला माहिती द्यावी.ही माहिती देणारी व्यक्ती सामान्य नागरिक,कर्मचारी किंवा अधिकारी यांपैकी कोणीही असू शकते.विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गुपित ठेवले जाईल,अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
  • येथे नोंदवा थेट तक्रार👇
बेकायदेशीर प्रकारांची तक्रार खालील टोल-फ्री क्रमांक व वेबसाईट येथे नोंदवता येईल.
टोल-फ्री क्रमांक: १८००००२३३४४७५/१०४
वेबसाईट: https://amchimulgimaha.in
थेट संपर्क: जिल्हा शल्य चिकित्सक,सामान्य रुग्णालय गडचिरोली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!