Tuesday, May 26, 2026
Homeमुंबईराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन.. - प्रथम पुरस्कार...

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन.. – प्रथम पुरस्कार १ लाख रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-१२ जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.त्याअनुषंगाने राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने “संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५-२६” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्ये,मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण राबविण्यात येणार असून,या प्रशिक्षणात संविधानासंबंधी सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.हा राज्यस्तरीय उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग यांच्या वतीने राबविण्यात येत असून, भारतीय संविधानातील मूल्ये, मूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. युवकांनी संविधान समजून घेऊन जबाबदार,सजग आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नागरिक म्हणून घडावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. “घर घर संविधान” या संकल्पनेतून ही जनजागृती चळवळ राज्यातील प्रत्येक घरापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.सदर प्रश्नमंजुषा राज्यातील इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली असून,संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.येत्या, सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ होणार आहे.
प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून आवश्यक अध्ययन साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे.ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने(प्रॉक्टरिंगसह) परीक्षा घेण्यात येईल. सहभागासाठी केवळ ९९ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पुरस्कार १ लाख रुपये,द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये यासोबतच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देण्यात येणार असून,सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी),पुणे यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
हा उपक्रम आदिवासी विकास विभाग,अल्पसंख्यांक विकास विभाग,इतर मागास बहुजन कल्याण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट(बार्टी),पुणे तसेच युवा करिअर क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाची संपूर्ण माहिती,नोंदणी प्रक्रिया व अधिकृत सूचना www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून,नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बनावट संकेतस्थळाला बळी न पडता केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी,असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईलवर अचानक आलेल्या अलर्टने खळबळ.. – पुढील २४ तासांत पाच जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकताच काही वेळापूर्वी अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानकपणे "Extremely Severe Alert" म्हणून संदेश प्राप्त होताच एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,सदरचा संदेश हा अत्यंत गंभीर...

येत्या सोमवारी होणारी लोकशाही दिन सभा रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात येणार होते.जिल्ह्यातील नागरिकांनी...

दोन चिमुकल्या मुलींवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात दोन अल्पवयीन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तात्काळ...

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!