Tuesday, July 14, 2026
Homeगोंदियाअंगणात चुलीजवळ बसलेल्या चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून; चिमुकल्याचा मृत्यू..

अंगणात चुलीजवळ बसलेल्या चिमुकल्याला बिबट्याने नेले उचलून; चिमुकल्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात धक्कादायक तितकीच चित्तथरारक घटना उघडकीस आली आहे. सकाळच्या सुमारास चार वर्षीय चिमुकला आई-वडिलांसह घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला असतांनाच परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवून आई-वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकल्याला उचलून नेल्याची घटना आज,शुक्रवार ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव)येथे घडली.यात चिमुकल्याचा काही अंतरावरच मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.हियांश शिवशंकर रहांगडाले वय ४ वर्षे रा.खडकी(डोंगरगाव) ता.तिरोडा, जि.गोंदिया असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकल्याचा नाव आहे.
सकाळच्या सुमारास थंडीचा जोर कायम असल्याने गावखेड्यातील बरेच नागरिक शेकोट्या वा पाणी गरम करण्यासाठी चुलीत काळ्या लावून विस्तवाचा आसारा घेतात.अश्याच प्रकारे आज शुक्रवारच्या सकाळी हियांश त्याची आई व वडिल घराच्या मागील अंगणात चुलीजवळ विस्तव शेकत होते.तितक्यात काही कळण्याच्या आत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पसार झाला. आरडाओरड केल्याने बिबट्या चिमुकल्याला सोडून जंगलात पसार झाला.हियांशचा मृतदेह घरापासून काही अंतरावर गावकऱ्यांना मिळून आला.घटनेने गावात संतापाची लाट उसळली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.घडलेल्या दुर्दैवी घटनेने रहांगडाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!