Sunday, August 30, 2026
Homeभंडाराबाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरचे धक्कादायक कारनामे उघड; आणखी एका बाळाची विक्री..

बाळ विक्री प्रकरणातील डॉक्टरचे धक्कादायक कारनामे उघड; आणखी एका बाळाची विक्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बाळ विक्री प्रकरणातील संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार तथा गोंदियाच्या ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’ चा संचालक नितेश वाजपेयीचे धक्कादायक कारनामे  पोलीस तपासात उघड होऊ लागले आहेत.उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तंदुरुस्त घोषित करताच पोलिसांनी १९ फेब्रुवारीच्या गुरुवारच्या सायंकाळी ताब्यात घेतले होते.त्यानंतर,आरोपी डॉ.वाजपेयीला पोलिसांनी शुक्रवार,२० फेब्रुवारीला भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करून आणखी काही बाळांची विक्री केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार,न्यायलयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.उद्या,मंगळवार २४ फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपणार असल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.तत्पूर्वी पोलीस तपासात बाळ विक्री प्रकरणात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.दहा दिवसांच्या मुलीला ‘नागपूरला मोफत उपचार करून देतो’ असे खोटे आमिष दाखवून,३ फेब्रुवारी रोजी तिचा दोन लाख रुपयांत सौदा करण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता.अश्यातच आता बाळ तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ.नितेश वाजपेयी याने डिसेंबरमध्ये मोहदुरा येथील एका जोडप्याला बाळ विकल्याचे निश्चित झाल्यानंतर,भंडारा येथील महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळाचा ताबा घेतला.डिसेंबर महिन्यात एका बाळाचा सौदा ४ लाख ७० हजार रुपयांत झाला होता.हे बाळ विकत घेणारे दाम्पत्य मूळचे मोहाडी तालुक्यातील मोहदुरा येथील आहेत.मात्र,बाळ विक्रीचे प्रकरण गाजू लागल्याने अटकेच्या भीतीने हे दाम्पत्य नातेवाईकांकडे मोहगाव देवी येथे वास्तव्यास गेले होते. बाळाच्या विक्रीसाठी ४ लाख ७० हजार रुपये मोजण्यात आले होते.त्यापैकी, ४ लाख रोख स्वरूपात,तर ५० हजार रुपये डॉक्टराच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाठविले.वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आतापर्यंत मुख्य सूत्रधार डॉ.नीतेश बाजपेयी याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.उपचाराच्या नावाखाली नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीने आणखी किती बालकांचा सौदा केला; याचा तपास पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!