Saturday, August 29, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-थोर समाजसुधारक तथा स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज,सोमवार २३ फेब्रुवारी रोजी देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर येथे प्रेरणादायी व शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करून संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मंगेश तुपट यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक ईश्वर गहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका प्रियंका तलमले व प्राची खरकटे यांनी अतिशय सुयोग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केले.
कार्यक्रमासाठी शिक्षिका अपर्णा जडे व वृषाली सुखदेव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा महाराजांच्या स्वच्छता,शिक्षण,सेवाभाव व व्यसनमुक्ती या विचारांची सखोल ओळख झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे उपस्थित होते.मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, “स्वच्छता ही सवय नसून संस्कार आहे. शिक्षणासोबतच चांगले विचार व सामाजिक जबाबदारी अंगीकारली तरच खरे नागरिक घडतात.” त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,सेवाभाव आणि समाजप्रती कर्तव्याची जाणीव अधिक दृढ झाली.प्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा,विचारमंचन व संकल्प वाचनाद्वारे सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.संत गाडगेबाबा महाराजांच्या विचारांना कृतीची जोड देत हा जयंती कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे तब्बल १० सराईत गुन्हेगार तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर येत  नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या...

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!