उद्रेक न्युज वृत्त :- एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.लखन भैय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
या प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या.या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता.आज हा निकाल देण्यात आला.या निकालात २००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्माना दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.२००६ मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचे एसआयटी चौकशीत उघड झाले होते.याप्रकरणी मुंबई पोलीस दलांतील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती.त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता.त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आले होते.मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते.परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते.मात्र राजकारणात त्यांना अपयश आले. आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

