उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया : सिंधीटोला (कामठा) येथे आरोपीच्या घरासमोरील सिमेंट रोडवर शिवमंदिर शेजारी बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्थापन करण्यासाठी बळीराम अनंतराम उईके यांनी चबुतरा तयार केला होता. त्या चबुतऱ्यावर आरोपी कुवरलाल आत्माराम तावाडे याने २२ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या बकऱ्यांना चारा देण्यासाठी चबुतऱ्यावर बकरीचा चारा टाकला. यातून दोघांत बाचाबाची झाली.२२ जानेवारीच्या रात्री ८ वाजता आरोपीने बळीरामला लाथाबुक्क्यांनी डोक्यावर,मानेवर मारून गंभीर जखमी केले.यात त्यांचा २३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता मृत्यू झाला. यासंदर्भात शेवंती बळीराम उईके (५०) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४ सहकलम ३ (२), (व्ही) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने करीत आहेत.