- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे.
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगाव ग्रामपंचायतीच्या समोरील दारातून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून लोखंडी आलमारीत ठेवलेले दस्तावेज जमिनीवर ठेवून पेट्रोल टाकून पेटवून दिले.काल रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली.या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉट(श्वान पथक)तसेच फॉरेन्सिक चमूला पाचारण केले.सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून एखाद्या दारुड्या व्यक्तीने दारूच्या नशेत सदर प्रकार केला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -