उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कष्टाचा व घाम गाळून काढलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात जास्त विश्वास बँकेवर ठेवतात.बँक त्यांना सर्वात जास्त सुरक्षित वाटते.मात्र, घोटाळ्यामुळे बँकांच्या विश्वासावर तडे जात आहे.त्यामुळे सरकारने बँकिंग सेक्टरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.केंद्रीय जन माहिती अधिकारी अभय कुमार यांनी नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती दिली आहे.आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी म्हणून लोक बँकेत पैसा ठेवतात.मात्र,गेल्या काही वर्षात बँकेतील घोटाळे उघडकीस आले आहे. यात कर्जबुडवे तसेच बँकेतील अधिकऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे.
देशभरातील राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान बँकांमध्ये एकूण ६४ हजार ८५६ घोटाळे झाले.यात तब्बल ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार झाला.तर कर्मचाऱ्यांनी ३८० घोटाळे केले.यात ३५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.