- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीची चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील ३१ वर्षीय तरुणाशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली.ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.अश्यातच तरुणाने प्रेम संबंधातून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे शारीरिक शोषण केले. मात्र,मुलगी बघण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मुलगी नापसंद आल्याने लग्न करण्यास नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सौरभ चित्तरंजन विश्वास वय ३१ वर्षे,रा.पळसगाव, ता.बल्लारपूर,जि.चंद्रपूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून अद्याप आरोपी फरार आहे.
पळसगाव येथील सौरभ याची २५ वर्षीय पिडीत तरुणीशी २०२५ पासून फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली.सुरुवातीला मैत्री व नंतर प्रेमप्रकरण सुरू झाले. एकमेकांचे मोबाइल क्रमांक देवाणघेवाण करून नियमित संपर्क सुरू झाला.आरोपीने लग्न करण्याचे आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादन करून तिचे शारीरिक शोषण केले.दरम्यान,आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी तरुणीच्या घरी जाऊन पाहणी केली होती.मात्र नंतर मुलगी पसंद नाही,असे सांगत लग्नास नकार देण्यात आला.यामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने पळसगाव येथे जाऊन सौरभला जाब विचारत लग्नाची विनंती केली, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी तरुणीने धाडस करून गुरुवारी बल्लारपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.तक्रारीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.मात्र, आरोपी फरार झाल्याने पोलीस त्याच्या मागावर आहेत. पुढील तपास पीएसआय करिष्मा मोरे व पोलिस हवालदार यशवंत कुमरे करीत आहेत.
- Advertisement -

