Thursday, July 16, 2026
Homeभंडाराफायनांन्स कंपन्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण……

फायनांन्स कंपन्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- धार्मिक एकता ट्रस्टच्यावतीने कर्जमुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्यात फायनांन्स कंपन्यांच्या बळजबरीपणामुळे अनेक जण त्रस्त आहेत.अवैध सावकारीचा विळखा बसला आहे.यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.गुन्हे दाखल करण्यात यावे;  या मागणीसाठी काल,५ मार्चपासून अजयकुमार भारतीय यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.

फायनान्स कंपनी व त्यांचे एजंट तसेच विना लायसन्स सावकारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. सुप्रिम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कर्जमुक्तीचे कार्डधारकांना व्याज न आकारता वेळ देण्यात यावा, ज्या पतसंस्था, फायनान्स कंपन्या व सावकार जाणीवपूर्वक चेक बाऊंस करून १३८ ची केस बनवितात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कर्जदाराची संपत्ती जबरन हिसकावून घेण्यास कारणीभूत ठरणारा सरफेसी ॲक्ट २००२ मध्ये बदल करण्यात यावा; आदी प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत.

उपोषणस्थळी राजेश इंगोले, राजेश शेवलकर, वीरेंद्र कहालकर, रिता भोयर, रवी बर्वे, येशुदास चौबे, धनराज चाचेरे, दीप्ती मानापुरे, बैजलाल येळेकर, रतनघोष बारई, चंद्रकुमार पडारे, रतन मने, कुंभराज पटले, पदमाकर पंधरे व अन्य नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!