Wednesday, June 10, 2026
Homeदेसाईगंजफरी जंगल परिसरात बैलाची शिकार; वाघ वा बिबट्या संभ्रम झाले निर्माण - देसाईगंज...

फरी जंगल परिसरात बैलाची शिकार; वाघ वा बिबट्या संभ्रम झाले निर्माण – देसाईगंज तालुक्यातील घटना; वनक्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे यांनी घटनास्थळी घेतली धाव

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- तालुक्यातील फरी जंगल परिसरात एका बैलाची शिकार झाली असल्याची घटना आज १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.मात्र नेमकी शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली; कळू न शकल्याने संभ्रम निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की,काल १६ मार्च रोजी फरी गावातील गुराखी देवचंद पेंदाम हे नेहमी प्रमाणे गायी – ढोरे चराई करीता फरी जंगल परिसरात गेले होते.मात्र त्याच गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे बैल घरी परत आले नसल्याने त्यांनी व गावातील नागरिकांनी शोधाशोध केला.मात्र त्यादिवशी त्यांना बैलाचा थांगपत्ता लागलेला नाही.परत पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज १७ मार्च रोजी फरी जंगल परिसरात शोधाशोध केल्याने आज दुपारच्या सुमारास बैलाची शिकार झाले असल्याचे आढळून आले.

फरी गावातील पांडुरंग आसाराम शेंडे यांच्या मालकीचे असलेल्या बैलाची शिकार झाल्याची माहिती वनक्षेत्र सहाय्यक के.वाय.कऱ्हाडे यांना देण्यात आली.माहिती मिळताच कऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.घटनास्थळावरून बैलाची शिकार वाघाने केली वा बिबट्याने केली कळू न शकल्याने सदर घटनास्थळी कॅमेरा लावून छायाचित्रावरून कळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.वनक्षेत्र सहाय्यक कऱ्हाडे यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळावरून पाहणी केल्यानंतर वाघाने शिकार केली असावी; असा अंदाज वर्तविण्यात येत असल्याची माहिती दिली.तसेच फरी गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी जंगल परिसरात जाण्याचे टाळावे व सतर्कता बाळगण्याचे आवाहन कऱ्हाडे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!