Thursday, July 30, 2026
Homeनागपूरफटाके तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू तर तीन कामगार जखमी...

फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू तर तीन कामगार जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर-काटोल मार्गावरील कोतवालबर्डी स्थित एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात आज,रविवार १६ फेब्रुवारीच्या दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट होऊन स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू तर तीन कामगार जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्याच्या नागपूर-काटोल रोडवरील कोतवालबर्डी येथे ही फटाके निर्मिती करणारा कारखाना आहे.फटाके निर्मिती करणाऱ्या कारखान्यात फटाक्यांच्या कव्हर मध्ये बारुद भरुन त्याचे फटाके तयार करण्याचे काम सुरू असतांना दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.तर घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात व नंतर नागपुरात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी कळमेश्वर पोलीस अधिक तपास करीत असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीसचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर,काटोल नगरपालिकांतून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या.ॲम्बुलन्स देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आल्या.या स्फोटामागचे नेमके कारण काय? यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.या घटनेत मृत्यू झालेले दोघेही मध्यप्रदेशच्या शिवनी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.घटनेतील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.एशियन फायर वर्कच्या मिल बॉल युनिटमध्ये दुपारी हा स्फोट झाला.त्यावेळी तिथे सात ते आठ जण काम करत होते.तर स्फोटाच्या वेळेला कंपनीत ३१ जण काम करत होते.दरम्यान कंपनीच्या मिल बॉल युनिटमध्ये फटाक्याची वात बनवण्याचे काम करण्यात येत होते,त्यावेळी हा स्फोट झाला असल्याचे सांगितले जाते.स्फोटानंतर कारखान्यात आग लागली होती,मात्र ती आटोक्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!