- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-देशातील प्रसिद्ध पार्ले-जी बिस्किट कंपनीवर फॉरेन ॲसेट युनिट आणि आयकर विभागाच्या चौकशी पथकाकडून आज,शुक्रवारी ७ मार्चला धाड टाकण्यात आली.आज सकाळपासूनच कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी सुरु होती.पार्ले-जी बिस्किट कंपनी ही मुंबईच्या विलेपार्ले परिसरात स्थित आहे. सदर कंपनी ही १९२९ साली सुरू करण्यात आली होती.काही कालावधीत पार्ले-जी बिस्किट आणि चहाची जोडी फेमस झाली व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पार्ले-जी बिस्किटचे दिवाणे झाले.विले-पार्ले नावावरुन कंपनीला पार्ले नाव देण्यात आले असे बोलल्या जाते.१९३८ मध्ये कंपनीने पार्ले-ग्लुको नावाने बिस्किटे तयार केली होती.त्यानुसार कंपनीने सर्वांवर छाप पाडत भरघोस उत्पन्नासह नफा कमविला.२०२३ या आर्थिक वर्षात ७४३.६६ कोटी रुपयांवरून २०२४ वर्षात १६०६.९५ कोटी रुपये नफा वाढला.कंपनीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्याचे आयकर विभागास(incom tax department) लक्षात येताच त्यांनी आज धाड टाकली असल्याचे दिसून येत आहे.
- Advertisement -