Sunday, April 19, 2026
Homeचंद्रपूरपोलीस असूनही चोरी करणाऱ्या 'चोरट्याचे' अखेर निलंबन…

पोलीस असूनही चोरी करणाऱ्या ‘चोरट्याचे’ अखेर निलंबन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शहरातील दोन चंद्रपूर घरफोड्यांमध्ये अटकेत असलेला स्थानिक गुन्हे शाखेचा शिपाई नरेश डाहुले याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शनिवारीच निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पोलिस शिपाई असलेला नरेश डाहुले याला शेअर ट्रेडिंगचा नाद लागला होता. या नादात तो पूर्णतः बुडाला. अनेक पैसे त्याने यात गमावले.परिरणामी त्याच्यावर जवळपास २२ लाखांचे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्याला नेहमीच सतावत होता आणि यातूनच त्याने चोरीचा मार्ग अवलंबला.घराशेजारी असलेल्या मुस्तफा रमझान शेख यांच्या घरी कुणी नसताना त्याने प्रवेश करून चोरी केली.तसेच यापूर्वीसुद्धा घराशेजारी राहणाऱ्या संगीता ठाकरे यांच्या घरीसुद्धा चोरी केली होती.या घटनेचा पोलिस विभाग करीत असतानाच नरेश डाहुले याचे कारनामे पोलिसांनी कळले. ही बाब उघड होताच रामनगर पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान,जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी त्याला लगेच निलंबित केले.

रामनगर पोलिसांनी नरेश डाहुले याला चोरीच्या प्रकरणात शनिवारी अटक केली होती.त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली होती.मात्र,पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या चोरीच्या प्रकरणासाठी डाहुले याला न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेऊन पुन्हा न्यायालयात हजर केले.यावेळी न्यायाधीशांनी मंगळवार-पर्यंत तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.१४ नोव्हेंबरच्या चोरीतील ६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ ऑगस्टच्या चोरीसंदर्भातील तपास रामनगर पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!