Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरपोलीस असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश.. - आरोपी...

पोलीस असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश.. – आरोपी भंडारा व चंद्रपूर जिल्ह्याचे.. – आरोपींकडून १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पैश्यासाठी कोण,कुठल्या थराला जाईल,हे सांगताच येत नाही.पैश्याची हाव लय खतरनाकच म्हणावी लागेल.पण,चोर कितीही चोऱ्या करीत असला तरी तो एक ना एक दिवस सपडतोच.अश्याच प्रकारे नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणाऱ्यांच्या मूल पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.चारजण स्वतःला चंद्रपूर पोलीस भरारी पथकाचे मोठे अधिकारी असल्याचे भासवायचे व रक्कम वसूल करायचे.पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच मुल पोलिसांनी अजय विजय उईके वय ३० वर्षे,रा.गजानन मंदिर रोड,शितला माता मंदिर मागे,चंद्रपूर,संगिता बादल दुबे वय २६ वर्षे,बादल दुर्गाप्रसाद दुबे वय ३५ वर्षे,हे दोघेही रा. रेंगेपार,ता.साकोली,जि.भंडारा या तिघांना अटक करण्यात आली आहे.तर चौथा आरोपी देवेंद्र चरणदास सोनवणे वय ३० वर्षे रा.निलज,ता. साकोली, जि.भंडारा(हल्ली मुक्काम-भिवापूर वार्ड, चंद्रपूर हा सध्या फरार आहे.पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.आरोपींकडून १२ लाख ५० हजाराची एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार,४५ हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन व १५ हजार रुपये रोख रक्कम असा १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करणाऱ्या टोळीने डोंगरगावच्या एजाज शेख यांच्या अंडा-आमलेट दुकानात जाऊन ग्राहक दारू पित असल्याचा बनाव करत कारवाईची धमकी दिली व ५ हजार रुपये खंडणी उकळली.या प्रकरणावरून  रविवार १३ जुलै २०२५ रोजी मुल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला. तत्पूर्वी याच टोळीने ३ जुलै २०२५ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३५ वर्षे रा.चिरोली यांच्या घरी एमएच ३४ सीजे ५८२४ क्रमांकाच्या अर्टीका कारने जाऊन स्वतःला चंद्रपूर पोलीस भरारी पथकाचे अधिकारी असल्याचे भासवले.विनापरवाना दारु साठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून तडजोडीअंती १० हजार रुपयांची खंडणी वसूल केली.या दोन्ही प्रकरणावरून मुल पोलीस खंडणी वसूल करणाऱ्या टोळीच्या मागावर होते.पोलिसांना टोळीचा सुगावा लागताच तिघांना धरदबोचले.मात्र, यातील एक आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी,पोलीस हवालदार जमीर खान पठाण, पोलीस हवालदार भोजराज मुंडरे,नाईक पोलीस अंमलदार चिमाजी देवकते,पोलीस अंमलदार नरेश कोडापे,पोलीस अंमलदार शंकर बोरसरे,पोलीस अंमलदार संदीप चुधरी यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!