- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-उमरेड-गिरड महामार्गालगत एमआयडीसी बसथांबा परिसरात लैंगिक अत्याचार करून प्रेयसीची हत्या करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.लोकेश गोपाळ जुगनाके ३०,रा.अड्याळ टेकडी,ता.नागभीड, जि.चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सोमवारी १८ नोव्हेंबरच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास पूजा नरेश मुंघाटे वय २६, रा.कावरापेठ, उमरेड या तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीला ताब्यात घेत अटक केली.लोकेश जुगनाके हा पेंच अभयारण्य परिसरात कुक आहे.
काही महिन्यांपूर्वी मृत पूजा आणि आरोपी लोकेश याची इन्टाग्रामवर ओळख झाली.ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेम प्रकरण सुरू झाले.रविवारी १७ नोव्हेंबर रोजी पूजा अगदी सकाळीच टिफीन आणि बॅगसह शिबिरासाठी जात असल्याचे सांगून गेली होती.दिवसभरात तिचा काहींशी वार्तालापही झाला होता.शिवाय,रात्री आईसोबतसुद्धा तिने संवाद साधला होता.
रात्रभर दोघेही ब्रम्हपुरी परिसरात थांबले.सकाळीच ब्रम्हपुरी येथून ट्रॅव्हल्सने उमरेडला निघाले. हत्याकांडाचा हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास घडला असावा,असा कयास लावला जात आहे. आरोपीने दुपट्टयाने गळा आवळून तिची हत्या केली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची बाब समोर येत आहे.दरम्यान, काल मंगळवारी आरोपी लोकेश जुगनाके याला उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३,६४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पूजा मुंघाटे हिचा मृतदेह आढळून आल्यानंतर उमरेड ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.उमरेड येथे दुपारी शवविच्छेदनाची प्रक्रिया आटोपली.येथून सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी नागपूर मेडिकलला मृतदेह रवाना केला गेला. आज,मंगळवारी अगदी सकाळपासूनच आप्तस्वकीय शवविच्छेदनाची प्रतीक्षा करीत होते. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि प्रक्रियेला विलंब लागला,या लेटलतीफ कारभारामुळे काल,मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नातेवाइकांना मृतदेह सुपुर्द करण्यात आला.नागपूर मेडिकलला तब्बल २४ तासांनंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडत असेल,तर ही बाब गंभीर असल्याचा संताप नातेवाइकांनी व्यक्त केला.
- Advertisement -

