- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ
वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. सदरची आग लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये लागल्याची प्राथमिक माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.चंद्रपूर शहरालगत औद्योगिक वसाहत असून या वसाहतीत विविध उद्योग उदयास आली आहेत.त्यातच आज सोमवारी दुपारच्या सुमारास लक्की पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आग लागल्याने लागूनच असलेल्या उद्योग व्यावसायिकांनी धसका घेतला.काही अवधीतच अग्निशमन दलाची सहा ते सात वाहने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.सदरची आग ही कश्यामुळे लागली हे अद्यापही अस्पष्ट असून घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
- Advertisement -