उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- पठान चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले आहे.पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहेत. शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे.’पठान’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून या वादाला सुरूवात झाली आहे. या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून हा वाद पेटला होता. दीपिकाच्या या कापड्यांवरून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आहेत अनेक संघटनांचे म्हणणे होते. शिवाजीनगर येथील राहुल चित्रपटगृहाबाहेरील ‘पठान’ चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाने पोस्टर्स उतरवले आहेत. शाहरुख खानच्या काही फॅन्सनी चित्रपटगृहाबाहेर एक भलंमोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. यानंतर बजरंग दलाकडून राहुल थिएटरच्या चालकांना इशारा देऊन पोस्टर काढण्याची विनंती केली गेली.