Saturday, June 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपुढील चार दिवस धो-धो बरसणार परतीचा पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट..

पुढील चार दिवस धो-धो बरसणार परतीचा पाऊस; हवामान खात्याकडून अलर्ट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण करणार आहे.जाता-जाता पाऊस  धुमाकूळ घालणार आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून एनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्र,कोकण या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान,सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी पाणी साचले होते.मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते तसेच अधूनमधून एखादी सर येऊन गेली.विदर्भ,मराठवाडा,कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. पालघर,ठाणे,धुळे,नंदुरबार,जळगाव, नाशिक,नगर, पुणे,सांगली,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर,जालना, लातूर,धाराशीव,अमरावती, बुलढाणा,चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर,वर्धा,वाशीम,यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!