- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यातील महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला आहे.सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच,उपसरपंच यांना दिले जाणार मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला.यापूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती; पण ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेल्या अनेक वर्षांपासून वाढ केली नसून त्यांची केवळ २०० रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे. सरपंच,उपसरपंचावर कृपा मग आमच्यावरच अवकृपा का? सरपंच,उपसरपंच तुपाशी अन् सदस्य उपाशी..!असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
गावाच्या विकासासाठी सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यदेखील प्रयत्नरत असतात.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानपूर्वक मानधन मिळायला पाहिजे; यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला; पण त्याची अद्यापही दखल घेतली नाही.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ २०० रुपये बैठक भत्त्यावर समाधान मानावे लागत आहे.शासनाने सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले,त्याला आमचा विरोध नाही.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; परंतु शासनाने ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून मानधनात वाढ करावी, अशी ग्रामपंचायत सदस्यांची मागणी आहे.
सदस्यांवर अन्याय👇
एका ग्रामपंचायतीमध्ये ७,९,११,१३ असे ग्रामपंचायत सदस्य असतात.राज्यात एकूण २७ हजार ९४३ ग्रामपंचायती आहेत.मात्र,शासनाने याचा विचार न करता केवळ सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ केली.हा २७ हजार ९४३ ग्रामपंचायतींमधील सदस्यांवरील अन्याय नाही का? असाही सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.
- Advertisement -

