Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्ग तब्बल २३ दिवस राहणार वाहतुकीसाठी बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ म्हणजेच रेल्वे बोगदा अंडरपास मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक आज,बुधवार १० जून २०२६ ते २ जुलै २०२६ पर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
देसाईगंज रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ मार्गावर मोठे खड्डे पडले असून,पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अपघाताची शक्यता तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, यासाठी सदर अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार हा मार्ग तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कालावधीत प्रवासी बसेस,पाणीपुरवठा, महावितरण दुरुस्ती,रस्ते दुरुस्ती आणि अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून प्रवास करण्यास मनाई असेल.नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८,भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!