Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीपीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता हवा असेल तर त्रुटींची पूर्तता करा..

पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता हवा असेल तर त्रुटींची पूर्तता करा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार आहे.मात्र,अनेक शेतकऱ्यांच्या नोंदींमध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे,बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नसणे,तसेच जमिनीच्या नोंदींची पडताळणी प्रलंबित असणे,अशा विविध त्रुटींमुळे पात्र लाभार्थ्यांना येणाऱ्या २१ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.तरी शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तपासून त्यातील त्रुट्या त्वरित दुरुस्त कराव्यात,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
लाभार्थ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC) म्हणजेच ऑनलाईन सेतू केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करावी.तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याची खात्री करून घ्यावी. संबंधित तहसील कार्यालय,तलाठी किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधून जमिनीच्या नोंदीतील त्रुटींची पडताळणी करावी.
प्रधानमंत्री किसान पोर्टलवर आता ‘अपडेट मिसिंग’ नावाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला असून,अपात्र झालेल्या किंवा त्रुटीपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांनी सीएससी केंद्रात जाऊन हा पर्याय वापरून आवश्यक माहिती व कागदपत्रे जोडून नोंदी अद्ययावत करावे. योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी नोंदीतील सर्व त्रुटी तातडीने दूर कराव्यात,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे,इतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनीही याकडे लक्ष घालून पुढील प्रक्रिया पार पाडावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!