Monday, August 17, 2026
Homeभंडारापिकांना पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; शेतकरी ठार..

पिकांना पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला; शेतकरी ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथील शेतकऱ्यास वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल,रविवार ३० मार्च रोजी घडली असून आज,सोमवार ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.खैरी/पट येथील ४० वर्षीय
शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख हे त्यांच्या मालकी शेत शिवारातील शेतात काल,रविवारी सायंकाळच्या सुमारास मोटार पंपाद्वारे पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.अशातच दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानकपणे हल्ला करून ठार केले आहे.
माहितीनुसार,डाकराम देशमुख यांनी त्यांच्या मालकी शेतात मका पिकाची लागवड केली आहे.अशातच शेतकरी डाकराम हे शेतात लागवड केलेल्या मका पिकांना कृषी पंपाद्वारे काल,रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पाणी देण्यासाठी गेले असता रात्र होऊनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करीत गावकरी तसेच वन विभागाचे कर्मचाऱ्यांसह शोधाशोध केली.रात्रीच्या सुमारास डाकराम यांचा शोध न लागल्याने परत पुन्हा आज,सोमवारी सकाळच्या सुमारास शोधाशोध केली असता डाकराम यांचा मृतदेह शेतातील मक्याच्या पिकात आढळून आला.घटनास्थळी शेतकऱ्याच्या पोटा खालील भाग अर्धवट खाल्लेला दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान,गेल्या १५ ते २० दिवसांपासून खैरी/पट,विहीरगाव,डांबेविरली व टेंभरी गाव परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन होत असून,वाघाने अनेक जनावरांची शिकार केल्याने  पीडित शेतकऱ्याची वाघानेच शिकार केल्याचा संशय व्यक्त करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!