उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी :- शहरातील अनेक गावांना जोडणारे आणि व्यापारी दृष्टिकोनातून मुख्य म्हणून भगतसिंग चौकाची ओळख आहे.चौकामध्ये बाहेरून येणाऱ्यांची आणि गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.येणाऱ्या – जाणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होवू नये यासाठी येथे लाखो रुपये खर्च करून प्रसाधनगृह बांधण्यात आले.मात्र वर्ष लोटूनही येथे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात न आल्याने सदर प्रसाधनगृह शोभेची वास्तू बनले आहे.
लाखो रुपये खर्च करून सुद्धा सुलभ शौचालयाला पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था केली गेली नाही. रंगरंगोटी व पाण्याच्या नळाची फिटिंग करून पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या.मात्र टाक्यांमध्ये पाणीच नसल्याने त्या केवळ शोभेच्या वस्तूच बनल्या आहेत.प्रसाधनगृहाजवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीतून पाईपलाईन लावल्या गेली.परंतु अद्यापही त्या विहिरीवरील पाणी टाकीत जाण्याकरिता मशीन बसविण्यात आली नाही.त्यामुळे अनेकांना आपले नाक दाबून आत जावे लागते. तर शौचालयाचा वापर करताना पाण्याअभावी मोठ्या अडचणी पार कराव्या लागत आहेत.