उद्रेक न्युज वृत्त :- ‘जैसी करणी वैसी भरणी’ म्हणी प्रमाणे सध्याच्या घडीला पाकिस्तानची अवस्था झाली आहे.ज्या ठिकाणाहून मदत मिळायची त्या ठिकाणांहून मदत मिळणे बंद झाल्याने नको तशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.शेजारील देश पाकिस्तान सध्या गरिबीशी झुंजत आहे.तिथले लोक गरिबी आणि उपासमारीने त्रस्त आहेत. परिस्थिती अशी आहे की गरिबीला कंटाळून लोकांना आता किडनी विकावी लागत आहे.लोकांच्या गरिबीचा फायदा घेत तस्कर आता कसाई बनले आहेत. पाकिस्तानमध्ये ३२८ जणांची किडनी काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.मोठी गोष्ट म्हणजे एक किडनी प्रत्येकी एक कोटींना विकली जात आहे.
पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गरीब लोकांची किडनी काढून ती ३० लाख ते १ कोटी रुपयांना परदेशात विकली गेली आहे. तस्कर टोळीचा म्होरक्या फवाद मुख्तारवर ३०० हून अधिक किडनी काढल्याचा आरोप आहे.फवाद मुख्तारला याआधी पाच वेळा गैरव्यवहाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, मात्र प्रत्येक वेळी तो जामीन मिळवण्यात यशस्वी झाला होता.पाकिस्तान पोलिसांनी या तस्कर टोळीतील ८ जणांना अटक केली आहे.पोलिसांनी केलेल्या चौकशीत या लोकांनी सांगितले की ते श्रीमंतांना किडनी विकायचे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायचे. चौकशीदरम्यान,तस्करांची ही टोळी पूर्व पंजाब प्रांत तसेच पीओकेमध्ये सक्रिय असल्याचेही समोर आले आहे. मोठी गोष्ट म्हणजे किडनी काढल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
या प्रकरणावर पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, लोकांच्या खाजगी घरातूनच किडनी काढण्यात आली. या लोकांना किडनी काढण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणात किंगपिन मुख्तारला कार मेकॅनिकने मदत केल्याचेही समोर आले आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन गरीब लोकांना वेठीस धरत असे. या वर्षी जानेवारीमध्ये पंजाब पोलिसांनी अवयव तस्करी करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला होता.या टोळीने हरवलेल्या १४ वर्षीय मुलाची किडनी काढली होती.