Tuesday, September 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता पोहे,मैदाही मिळणार आनंदाच्या शिध्यात…..

आता पोहे,मैदाही मिळणार आनंदाच्या शिध्यात…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकार दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देणार आहे. यापूर्वी त्यात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल या चार वस्तूंचा समावेश होता. त्यात आता पोहे व मैदा या आणखी दोन वस्तूंची भर पडली आहे. शंभर रुपयांतच या ६ वस्तू मिळतील. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोन वस्तूंचा ‘बोनस’ देताना सरकारने एक चलाखी केली आहे. पूर्वी साखर, रवा व चणाडाळ प्रत्येकी एक किलो व तेलही एक लिटर दिले जात होते. आता सरकारने पूर्वीच्या २ वस्तूंच्या वजनात कपात केली आहे. साखर पूर्वीप्रमाणे एक किलो व तेल एक लिटर मिळणार आहेच. पण रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे मात्र फक्त अर्धा किलोच मिळणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील जिल्हे आणि वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील १ कोटी ६६ लाख लाभार्थींना आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित केला जाईल. यासाठी ५३० कोटी १९ लाख मंजूर केले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!