उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर(मुल) :- मुल तालुक्यात ऑक्टोंबर ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणात नाटक,शंकर पट दंडार कार्यक्रम भरविण्यात येतात.त्याअनुषंगाने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडून आयोजकांनी नियमानुसार कार्यक्रमाची,प्रयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे.परंतु तालुक्यातील चिचाळा,भेजगाव येथील मंडळांनी विनापरवानगी नाटकाचे आयोजन केल्याने सदर मंडळावर कायद्यानुसार प्रशासनाकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
७ मार्च रोजी चिचाळा येथे आयोजित केलेल्या नाटकाची तसेच २२ मार्च रोजी भेजगाव येथे आयोजित केलेल्या नाटकाची परवानगी आयोजकांनी घेतली नव्हती.नाटकाला मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेता याबाबत प्रशासनाला कल्पना असणे आवश्यक आहे.जेणेकरून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. झाला तर प्रशासनास त्यावर वेळीच उपायोजना करता येईल. वर नमुद गावात कार्यक्रमाला परवानगी न घेता आयोजकांनी नाटकाचे आयोजन करत प्रचलीत कायदेशीर प्रक्रियेला बगल दिली असल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.