उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा :- तालुक्यातील गुरनोली गावातील डॉ. परशुराम खुणे यांना नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने नुकतेच केंद्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बाल कलाकार ते वयाच्या ७० वर्षापर्यंत झाडीपट्टी रंगभूमीत मागील पाच दशके कलागुणांतुन समाज परिवर्तनाचे धडे देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
नाट्यसृष्टीतील तसेच समाजसेवेतील योगदानाबद्दल त्यांना जादूगार सुनिल भावसार स्मृती पुरस्कार, श्यामराव बापू प्रतिष्ठान तर्फे कलागौरव पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार व शेती निष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी गुरनोली गावाची १५ वर्षे सरपंच म्हणून जनसेवा केली आहे.
त्यांच्या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरान्वीत केले. याबद्दल त्यांच्याच गावातील शुभम सार्वजनिक वाचनालय गुरनोली येथे डॉ. खुणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रा.राजेंद्र वालदे व गावकरी उपस्थित होते.