Tuesday, September 8, 2026
Homeसिंदेवाहीपंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.....

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या मेधा भाले यांच्यावर कारवाईची मागणी.. – भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह,अश्लाघ्य व शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिंदेवाही भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छाया हाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज,शुक्रवार २४ जुलै रोजी सिंदेवाही पोलिस ठाण्यामार्फत चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात संबंधित व्हिडिओची चौकशी करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ॲड.मेधा भाले यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या जबाबदार व्यक्तींनी सामाजिक व सार्वजनिक जीवनातील मर्यादा पाळणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीविषयी अश्लाघ्य व अवमानकारक भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर असून,अशा वक्तव्यांमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.तसेच,ॲड.मेधा भाले या पेशाने वकील असल्याने त्यांच्या वर्तनाची शासनानेही गंभीर दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असाही इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना छाया हाडगे,अपूर्वा चिंतलवार,मीनाक्षी दलाल,रक्ष्मी परसावार,अंजली बल्लेवार,शेवंता सामुसाखरे,प्रतिभा मेश्राम,जयश्री  करकाडे,चंद्रकला नर्मलवार,मोहिनी गेडाम,निता परसावार,तनुजा रुद्रकार यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!