उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- सध्याच्या घडीला खर्रा,गुटखा व तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी व इतर ठिकाणी थुंकी मारणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बऱ्याच ठिकाणी अशा कृत्त्यांवर निषेध म्हणून छोटे-मोठे फलक लावण्यात येत असले; तरीही त्याचे कुणाला ‘ना सुतक ना बारसा’असे दिसून येते.असाच प्रकार हल्ली निदर्शनास आला व चौघांना महागात पडला आहे.चौघेही गोंदिया जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील वास्तव्यास राहणारे असून न्यायालय परिसरात तंबाखू-गुटखा खाऊन ‘पीचिक नं’ थुंकी मारल्याने चौघांनाही प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सार्वजनिक ठिकाणी,शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व इतर ठिकाणी खर्रा,गुटखा तंबाखू,बिडी,सिगारेट ओढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अनेकांकडून ऐरणीवर टांगला जातो आहे.तुम्ही कितीही फलक लावले तरीही अनेकांना काहीही फरक पडणार नाही.असाच प्रकार न्यायालय परिसरात घडला आहे.पठ्ठ्यांनी चक्क न्यायालय परिसरातच पिचकाऱ्या मारणे सुरू केल्याने; सदर बाब निदर्शनास येताच दंड ठोठावण्यात आला आहे.तीन दिवसांपूर्वी रमेश आत्माराम गणवीर राहणार मरारटोली,राकेश मुनेश्र्वर माहुले रा.पांजरा,ओमकार झामसिंग नागपुरे रा.इर्री व विकास नरेंद्र चव्हाण रा.गड्डाटोली या चौघांनी न्यायालय परिसरात तंबाखू- खर्रा खाऊन ‘पीचिक-पीचिक’ मुखातून पिचकाऱ्या मारल्याने प्रत्येकी १२०० रुपये प्रमाणे न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी चौघांनाही दंडाची शिक्षा ठोठावली आहे.