Wednesday, September 30, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

नैनपूरच्या महात्मा गांधी नगरपरिषद शाळेत श्रमदानातून स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- “माझा गाव…माझी शाळा…माझी जबाबदारी” या संकल्पनेतून देसाईगंज शहराच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळेत आज,सोमवार २९ जून रोजी सकाळच्या सुमारास भव्य स्वच्छता व श्रमदान मोहीम उत्साहात पार पडली.
शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांच्या नेतृत्वात तथा मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात गावातील युवक-युवती,महात्मा गांधी स्काऊट-गाईड पथक,कब-बुलबुल पथक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विशेषतः गजानन कवासे यांनी व शाळेतील स्काऊट गाईड मुलांनी श्रमदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करत इतरांनाही श्रमदानाचा प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.शाळेच्या शिक्षिका भारती राऊत,तसेच शिक्षक मंगेश तूपट,ईश्वर गाहाने,प्राची खरकाटे, तृषाली सुखदेवे यांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
श्रमदानाद्वारे शाळा परिसराची स्वच्छता,तण काढणे, परिसर सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. “स्वच्छ शाळा,सुंदर शाळा आणि संस्कारक्षम वातावरण” हा संदेश देत सर्वांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव व्यक्त केली.या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक स्वच्छ,सुंदर व आकर्षक झाला असून उपस्थितांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी औषधांची...

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!