- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जानाळा येथील दोन सख्ख्या भावंडांवर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना काल,शुक्रवारी २१ मार्चच्या पहाटेच्या सुमारास मूल-चंद्रपूर मार्गावरील अंधारी नदी पुलाजवळ घडली.शुभम राजू आकुलवार वय २७ वर्षे व करण राजू आकुलवार वय २४ वर्षे,रा.जानाळा ता.मूल,जि.चंद्रपूर अशी मृतक भावंडांची नावे आहेत. करण हा कंत्राटी नोकरीवर रूजू होण्यासाठी भावासोबत नागपूरला जाणार होता.अशातच दोन्ही सख्ख्या भावंडांवर काळाने घाला घातल्याने आकूलवार कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या शुभम व करणच्या मृत्यूने जानाळ्यात शोकळा पसरली आहे.
मोठा भाऊ शुभम आकुलवार हा चंद्रपूर येथील खासगी कंपनीत कंत्राटी नोकरी करीत होता.तर लहान भाऊ करण याचीही नागपुरातील एका खासगी कंपनीत कंत्राटी नोकरीसाठी निवड झाली होती.शुभम हा जानाळा येथून दररोज दुचाकीने कंपनीत कामाला जायचा.करणला काल शुक्रवारी कंपनीत रुजू व्हायचे होते.त्यामुळे नेहमीप्रमाणे शुभम हा करणला सोबत घेऊन दुचाकी क्रमांक-एमएच ३४ यू १९८७ ने चंद्रपूरकडे निघाला होता.चंद्रपूर बसस्थानकावरून करण हा नागपूरला जाणार होता.मात्र,अंधारी नदी पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अज्ञात वाहनाची धडक इतकी जोरदार होती की,दोन्ही भावंडे जागीच गतप्राण झाले.
शुभम व करण यांचे वडील राजू आकुलवार हे भूमिहीन आहेत.घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतांनाही त्यांनी मुलांना शिकविले.बहिणीचा विवाह झाला.घरी उदरनिर्वाहाचे काहीही साधन नसल्याने वडील मिळेल ती मजुरी करतात.मोठा शुभम कंपनीत काम करायचा तर करणचीही कंपनीत निवड झाल्याने कुटुंबीय आनंदित होते.मात्र,नियतीने डाव साधल्याने आकुलवार परिवाराच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.
- Advertisement -