Sunday, July 12, 2026
Homeचंद्रपूरना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच; ग्रामसेवकासह महिला सरपंचावर एसीबीची कारवाई..

ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाच; ग्रामसेवकासह महिला सरपंचावर एसीबीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.लाच घेणाऱ्यापेक्षा लाच देणाराही तितकाच जबाबदार असतो.मात्र,अनेकजण समाधान न मानता जास्तीची अपेक्षा व्यक्त करून कारवाईस सामोरे जातांना दिसून येतात.त्यातच ‘पैश्याची हाव अन् देवा मले पाव’ असे करणाऱ्यांचे वाटोळे होत असते.अश्याच प्रकारे व्यवसाय उभा करणाऱ्या एका तक्रारदारास ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अजयपूर येथील ग्रामसेवकास ५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले तर महिला सरपंचास १० हजारांची मागणी केल्या प्रकरणी काल,गुरुवारी ६ मार्चला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) अटक केली आहे. अजयपूर ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेवक विकास सुधाकर तेलमासरे व महिला सरपंचा नलिनी तलांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ग्रामसेवक तेलमासरे याने काल गुरुवारी चंद्रपूर पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारली. चंद्रपूर येथील तक्रारदाराने एका अजयपुरात  शेतजमीन खरेदी केली.जमिनीचे फेरफार नोंद करून कुक्कुटपालन व्यवसायाला ना-हरकत प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायत अजयपूर येथे कागदपत्रे सादर केली होती.शिवाय त्याने १४ फेब्रुवारीला आमसभेत फेरफारचा विषय ठेवला होता. मात्र,त्यावर निर्णय घेण्यात आला नाही.त्यासाठी सरपंच नलिनी तलांडे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याचदिवशी ग्रामसेवक तेलमासरे यानेही १० हजारांची डिमांड केली.अखेर ५ हजार रुपयांच्या मोबदल्यात ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले. मात्र,लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.सदरची कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधिक्षक संजय पुररंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले,पोलिस निरिक्षक जितेंद्र गुरनुले,सहाय्यक फौजदार रमेश दुपारे, पोलीस हवालदार हिवराज नेवारे,पोलीस शिपाई वैभव गाडगे, अमोल सिडाम,राकेश जांभूळकर,मेघा मोहुर्ले,सतीश सिडाम यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!