Saturday, September 12, 2026
Homeचंद्रपूरनायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेकांना नायलॉन मांजाच्या धाग्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.नायलॉन मांजाची विक्री करण्यावर बंदी असतांनाही काहीजण पैश्याच्या लालसेने नागरिकांच्या जीवाशी खेळ करू लागल्याचा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे.प्रकरणी चंद्रपूर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन दुकानदारांकडून तब्बल ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे.मनिष सुरेश राउत वय ४७ वर्षे,रा.बॉम्बे प्लॉट, राजीव गांधी नगर, चंद्रपूर व एकनाथ केशव चवरे वय ५२ वर्षे,रा.बॉम्बे प्लॉट,इंदिरानगर,चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन
यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.अश्यातच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या इंदिरानगर परिसरातील मनिष राउत याच्या दुकानाची झाडाझडती केली असता विविध रंगांच्या प्लास्टिक चक्रीवर गुंडाळलेला २४ नग प्रतिबंधित नायलॉन मांजा धागा, किंमत अंदाजे २४ हजार रुपये व एकनाथ चवरे याच्याकडून २६ नग प्रतिबंधित नायलॉन मांजा धागा, किंमत अंदाजे २६ हजार रुपये असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून रामनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पर्यावरण (संरक्षण)अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले,सुनील गौरकार,पोलीस हवालदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे,रजनिकांत पुठ्ठावार,दीपक डोंगरे,इम्रान खान,पोलीस अंमलदार किशोर वाकाटे, शशांक बदामवार,हिरालाल गुप्ता,छाया निकोडे यांचेसह चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!