Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडानागरिकांना त्रास देणाऱ्या पुरवठा शाखेतील कनिष्ठ लिपिकावर कठोर कारवाईची मागणी.. - आम...

नागरिकांना त्रास देणाऱ्या पुरवठा शाखेतील कनिष्ठ लिपिकावर कठोर कारवाईची मागणी.. – आम आदमी पार्टीचे कुरखेडा तहसीलदारांना निवेदन सादर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपिक महादेव गणपत झाडे यांच्या नागरिकांसोबतच्या गैरवर्तनाविरुद्ध आज,मंगळवार २३ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात रेशन कार्ड प्रक्रियेत नागरिकांना होणारा त्रास आणि अपमानास्पद वागणुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार,महादेव झाडे हे रेशन कार्ड अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्रास देत आहेत.अर्जात त्रुटी असल्यास अर्जदारांवर अर्ज भिरकावण्याचे आणि उद्धटपणे वागण्याचे प्रकार घडलेले असून यामुळे महाराष्ट्र शासकीय कर्मचारी(वर्तणूक) नियम,१९७९ महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा,२०१५ आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा,२०१३ यांचे उल्लंघन होत आहे.त्यामुळे गैरवर्तनाची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले जाईल.या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला तहसील प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल,असेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष इरफान पठाण,सचिव अमृत मेहेर,जिल्हा कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार,संघटक  ताहिर शेख,सहसंघटक चेतन गहाणे,सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम,सदस्य अंकुश मडावी आदी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!