Saturday, September 5, 2026
Homeनागपूरनागपूर हिंसाचारातील फहीम खानच्या अडचणीत वाढ; दोन दिवसांचा पीसीआर..

नागपूर हिंसाचारातील फहीम खानच्या अडचणीत वाढ; दोन दिवसांचा पीसीआर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आपण मागे पुढे न पाहता काहीतरी करून बसतो व नंतर त्याचा पश्र्चाताप करीत असतो.असाच प्रकार नागपूर शहरात १७ मार्च २०२५ रोजी घडला.दंगल उसळली व दगडफेक,तोडफोड, जाळपोळ करून शांत असलेल्या राज्याच्या उपराजधानीला गालबोट लागले.अशातच आता मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खान वय ३८ वर्षे याच्या अडचणीत सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.फहीम खान नागपूर शहराच्या संजयबाग कॉलनी येथील रहिवासी असून तो मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. गणेशपेठ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला आहे.त्यातच काल,मंगळवारी ८ एप्रिलला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने सायबर पोलिसांना मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम शमीम खान याचा दोन दिवसांकरिता पीसीआर मंजूर केला आहे.प्रकरणावर न्यायमूर्ती एस.एच.उके यांच्यासमक्ष काल सुनावणी झाली.

यापूर्वी न्यायालयाने गणेशपेठ पोलिसांना फहीमचा ३१ मार्चपर्यंत पीसीआर (पोलिस कोठडी) दिला होता. त्यानंतर त्याला ‘एमसीआर’ मध्ये (न्यायालयीन कोठडी) पाठविण्यात आले होते.त्यावेळी पोलिसांनी फहीमचा पीसीआर मागण्याचा अधिकार राखीव ठेवला होता.त्यानुसार काल मंगळवारी सायबर पोलिसांनी फहीमला न्यायालयात हजर करून चार दिवसांचा पीसीआर मागितला.परंतु,न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता केवळ दोन दिवसांचा पीसीआर मंजूर केला आहे.फहीमतर्फे ॲड.अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.फहीमने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.त्यावर राज्य सरकारने दोन आठवड्यांपासून उत्तर सादर केले नाही.त्यामुळे सत्र न्यायाधीश आर.जे.पवार यांनी काल मंगळवारी जामीन अर्जावरील सुनावणी १७ एप्रिलपर्यंत तहकूब केली.याशिवाय,समान कारणामुळे फरार आरोपी मो.हरीश मो.इस्माईल, मो.शाहनवाज शेख मो.अर्शद शेख,मो.युसुफ शेख व नझीम सलीम शेख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही याच दिवशी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!